खेड; पुढारी वृत्तसेवा : मुसळधार कोसळणार्‍या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील दाभिळ नजीकच्या चिरेखाणीलगत असलेल्या संतोष धारू चव्हाण यांच्या घरालगत असलेला चिरखाणीचा काही भाग चव्हाण यांच्या घरावर कोसळून चव्हाण यांचे घर पूर्णत: दरडीखाली गाडले गेले आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी चव्हाण कुटूंबियांचे मोठे आर्थिक
नुकसान झाले आहे.

या घटनेमध्ये घरातील सर्व साहित्यासह एक दुचाकी आणि एक चार चाकी गाडीचे नुकसान झाले आहे. ही दुघर्टना घडल्यानंतर तहसीलदार सौ. प्राजक्ता घोरपडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तत्काळ चव्हाण कुटुंबियांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या
सूचना केल्या आहेत. संतोष चव्हाण यांच्यासह या ठिकाणी सहाजण राहत होते. या ठिकाणी प्रशासनाकडून पंचनामा सुरू असल्यामुळे नुकसानीचा निश्चित आकडा समजू शकला नाही.

तालुक्यातील नातूनगर घाग वाडीकडे जाणार्‍यारस्त्यावर लगतच असलेल्या डोंगरातील मातीचा काही भाग कोसळल्यामुळे हा मार्ग ठप्प झाला होता. प्रांताधिकारी सौ. मोरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशिद यांनी घटनास्थळी भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here