दोडामार्ग; पुढारी वृतसेवा : दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस सुरुच आहे. अनेक ठिकाणी कॉजवे, पूल पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे तिलारी धरण पाणीसाठा वाढत असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग शुक्रवारी (दि.८) रोजी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान सुरू झाला आहे. याआधी धरणाचे मुख्य चार दरवाजे १ जूनला सहा मिटरने उचलेले होते.

पावसामुळे शुक्रवारी (दि.८) रोजी तिलारी धरणाच्या पाणी पातळी दरवाज्यापर्यंत वाढल्याने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. हे पाणी तिलारी नदीत कालव्याद्वारे सोडण्यात येत आहे. पावसाचा जसजसा जोर वाढत जाईल तसतसा धरणाच्या पाण्याचा विसर्ग वाढत आहे. येथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी तिलारी विभागाचे अधिकारी, कर्मचारी मुख्य दरवाजाजवळील कार्यालयात उपस्थित असून पाहणी करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा ; 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here