जालगाव : दापोली शहरातील एका शाळकरी मुलाचे सायकलचे ब्रेक निकामी होऊन दि. 7 जुलै रोजी सायंकाळी अपघातात झाला. त्यात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा अंत झाला आहे. दापोली शहराजवळील गिम्हवणे आझादवाडी येथील आर्यन विनोद गौरत इयत्ता दहावी सेमी इंग्लिश माध्यमातून शहरातील लोकमान्य हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होता.

गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास शाळा सुटल्यावर नेहमीप्रमाणे सायकल घेऊन घरी जाण्यासाठी निघाला असता सायकलचे उतारात ब्रेक निकामी झाले आणि अपघात झाला. यावेळी तत्काळ त्याच्या मित्रांनी त्याला शाळेत पुन्हा नेले. शिक्षकांनी तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना सायंकाळी साडेसात वाजता त्याची प्राणज्योत मालवली. यामुळे गिम्हवणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here