माणगाव; पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमित्त माणगांव येथील स्टोन आर्टिस्ट ऋतिका विजय पालकर हिने 115 दगडांपासून विठ्ठल रखुमाई आणि वारकरी मंडळी अशी कलाकृती साकारली असून ती लक्षवेधी ठरत आहे. पंधरा दिवस अथक परिश्रमाने वैशिष्ट्यपूर्ण 115 दगड गोळा करून त्या दगडांचा मुळ आकार न बदलता विठ्ठल रखुमाई आणि वारकरी मंडळी अशी कलाकृती साकारली आहे. तीने यापूर्वीही अनेक कलाकृती बनवून पुणे, मुंबई, दिल्ली अशा विविध ठिकाणी आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवले होते. तिची प्रत्येक कलाकृती ही युनिक आहे. निसर्गात सापडणार्‍या नैसर्गिक आकाराच्या दगडांपासून ती विविध कलाकृती बनवते. तिच्या या आगळ्यावेगळ्या कलेचे कौतुक मान्यवरांकडून करण्यात आले.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here