चिपळूण : तालुक्यातील पेढांबे येथे नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धनश्री महेश थोरात (19, रा. उंब्रज, ता. कराड) असे मृत महिलेचे नाव आहे. या बाबत यल्लावा लक्ष्मण पवार (रा. पिंपळी खुर्द, पेढांबे ब्रिज) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात खबर दिली. ही घटना दि. 11 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पेढांबे येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनश्री महेश थोरात हिने दीड महिन्यापूर्वीच महेश थोरात (रा. उंब्रज) यांच्याबरोबर लग्न केले होते. या बाबत तिने घरच्यांना माहिती दिली होती. धनश्रीच्या आईने एसआयपीच्या कागदपत्रावर सही हवी आहे. त्यामुळे तू घरी ये असे फोनवरून सांगितले होते. त्यानुसार धनश्री 7 जुलै रोजी सकाळी 11 वा. पेढांबे येथे आली होती. दि. 11 जुलै रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जेवण करून ती आपल्या खोलीत गेली असता तिने नायलॉनच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here