राजापूर;पुढारी वृत्तसेवा: राजापूर आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात बुधवारी (दि.१३) दरड कोसळल्याने हा मार्ग अवजड वाहन वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. यानंतर बुधवारी मध्यरात्रीपासून ते गुरुवारी पहाटेपर्यंत कोसळलेली दरड काढण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले. यादरम्यान घाटातून एकेरी वाहतुक सुरु करण्यात आली. मात्र घाटातील एकूणच स्थिती पहाता राजापूर-कोल्हापूरला जोडणारा अणुस्कुरा घाट अवजड वाहन वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

अणुस्कुरा घाटात मध्यरात्रीनंतर दरड कोसळून मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आला. त्यामुळे कोल्हापूर-राजापूर मार्गावरील संपुर्ण वाहतूक बंद पडली. कोसळलेल्या दरडीचे वृत्त समजताच अणुस्कुरा चेकपोस्टवरील पोलीस कर्मचाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घाटात दाखल झाले. यानंतर मशनरीच्या सहाय्याने कोसळलेली दरड हटविण्यात आली. या मार्गातील कोसळलेली दरड सकाळपर्यंत हटवुन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली.

अणुस्कुरा घाटमातून राजापूर तालुक्यातील सर्व प्रकारची माल वाहतुक सुरु असते. यामध्ये कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर, तुळजापुर, मार्गावर एसटी वाहतुक सुरु असते. मात्र बुधवारी दरड कोसळल्याने ही सर्व वाहतूक ठप्प झाली. परंतु या घाटातील एकेरी वाहतुक सुरु असल्याचे समजत आहे.

हेही वाचा:

 

 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here