रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी तालुक्यातील उमरे येथे साडेचार वर्षांपूर्वी मुलीला मेसेज केले होते. माफी मागण्यासाठी घरी आलेल्या मुलाला आणि त्याच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत मारहाण केली होती. यात त्याचा काका दयानंद चौगुले याला जबर मार लागल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी मारहाण करणार्‍या पाच आरोपींना गुरुवारी न्यायालयाने ६ महिने साधा कारावास आणि प्रत्येकी ११ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, महेंद्र झापडेकर, कुमार शिंदे, महेश शिंदे, किशोर शिंदे, प्रणव शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात रामचंद्र चौगुले यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानूसार, चिन्मय चौगुलेने एका मुलीला मेसेज केला होता. म्हणून त्या मुलीची आणि तिच्या नातेवाईकांची माफी मागण्यासाठी चिन्मय आणि त्याचे नातेवाईक उमरे येथे कुमार शिंदे यांच्या घरी माफी मागण्यासाठी गेले होते. तेव्हा मेसेज केल्याच्या रागातून आरोपींनी जमाव करुन त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. कुमार शिंदेने चिन्मय चौगुलेला मारहाण केली. तेव्हा रामचंद्र चौगुले, दयानंद चौगुले आणि गुरुप्रसाद चौगुले हे चिन्मयला वाचवण्याचा प्रयत्‍न केले. त्यावेळी महेंद्र झापडेकर सुरुवात करा मी काय ते निस्तरतो असे म्हणाला व स्वतःपुढे होउन चिन्मयला मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्‍यान, दयानंद चौगुले पुन्हा चिन्मयला वाचवण्यासाठी मध्ये पडले असता महेंद्र झापडेकरने त्यांच्या छातीत मारल्यामुळे ते खाली पडले. इतर आरोपींनीही दयानंदच्या पोटात, पाठीत, डोक्यात जबर मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू जगीच मृत्‍यू झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करुन न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयाने याप्रकरणी ११ साक्षिदार तपासले असून ६ महिने कैद आणि प्रत्येकी ११ हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.

हेही वाचा  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here