रत्नागिरी/गुहागर;  पुढारी वृत्तसेवा :  किनारी भागात उधाणाची शक्यता असल्याने आगामी चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाने तालुक्यातील वेळणेश्‍वर येथील समुद्रकिनारील लोकवस्तीत समुद्राच्या भरतीने पाणी शिरल्याची घटना शुक्रवारी (दि. 15) घडली. नागरिकांना स्थलांतर करण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती गुहागर प्रशासनाने दिली आहे. येथील अठरा जणांच्या घराला समुद्राचे पाणी लागले. रत्नागिरीत शुक्रवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली मात्र, सायंकाळी जोरदार सरींनी हजेरी लावली.

आगामी चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सातत्य राहणार आहे. या कालावधीत ताशी 40 ते 60 कि.मी. वेगाने वारे वाहणार असून पावसाचा जोर मात्र कमी राहणार आहे. गेले दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने उसंत घेत वाटचाल सुरू ठेवली आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाने उसंत घेत जोरदार सरींनी हजेरी लावली. मात्र, काही भागात पावसाचा जोर कमी होता.
गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने जिल्हायत पूरस्थिती निर्माण केली होती. मात्र, पावसाचा जोर कमी झाल्याने मंडणगड, राजापूर, चिपळूण आणि खेड तालुक्यात उद्भवलेली पूरस्थिती ओसरू लागली आहे. खेडच्या जगबुडी नदीचे पात्र अद्यापही इशारा पातळीच्या वर असून नदी किनारी गावात पूूरसदृश स्थिती अद्याप कायम आहे.

गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. कोकणातील काही भागात पावसाने धुमाकूळ घातला होता. दरम्यान, अरबी सागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने आगामी चार दिवस रत्नागिरीसह सिंधुदर्ग जिल्ह्यात पावसाचे सातत्य राहणार आहे. काही भागात अतीमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. किनारी भागात ताशी 40 ते 60 कि.मी. वेगाने वारे वाहणार असल्याने किनारी भगाासह दुर्गम भागातही सावधगिरी बाळगण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

शुक्रवारी अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली किनारी भागात जोरादार पाऊस झाला. त्यामळे किनारी भागात दपारी भरती काळात उधाणाची स्थिती निर्माण झाली होती. समुद्र खवळलेल्या स्थितीत होता. ओहटीच्या काळात मात्र लाटांचा वेग कमी झाला.
दरम्या, आगामी चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात चार दिवस पावसाचे सातत्य राहणार आहे. 19 जुलैपर्यंत जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असून या कालावधीत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात किनारी भागासह दुर्गम भागात खबरदारी घेण्याचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी 61 मि.मी.च्या सरासरीने 567 मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here