
मालाड; पुढारी वृत्तसेवा : मालवणी येथे गेल्या २४ तासांत दाेन खून झाल्याने मालवणी परिसर हादरला आहे. सर्वत्र या खुनाची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंद करून तपास करत आहे.
पत्नीचा खून करुन पती स्वत:हून पाेलीस ठाण्यात हजर
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एमएचबी कॉलनी येथे मध्यरात्री साधारण १.३० ते २ वाजण्याच्या सुमारास एका अंध व्यक्तीने स्वत:च्या पत्नीच्या डोक्यात वरवंटा मारून खून केला. अंध व्यक्तीचे पत्नीसोबत काही कारणास्तव वाद झाल्याने रात्री झोपेत हा खून केला आहे. यानंतर काही वेळाने तो स्वत:च मालवणी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
क्षुल्लक कारणातून तरुणाचा खून
या घटनेची मालवणी परिसरात चर्चा सुरू असतानाच आंबोजवाडी येथे दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन मुलाने क्षुल्लक कारणाचा राग धरून एका तरूणाचा चाकूने वार करून खून केला. तौसिफ खान ( वय २० ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचलंत का?