राजापूर; पुढारी वृत्तसेवा :  शहरातील विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांच्यासह सहकारी नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांची भेट घेत शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करण्याची मागणी केली.

राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱया कोदवली येथील सायबाच्या धरणाकडून येणार्‍या पाणीपुरवठा वाहिनीचा मुख्य वॉल अचानकपणे बंद झाल्याने व शिळ जॅकवेलकडील वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने ऐन पावसाळ्यात शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली आहे. मुस्लिम बांधवांचा सण असताना पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने प्रशासनासह लोकपतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी माजी नगराध्यक्ष अ‍ॅड .जमीर खलिफे यांच्यासह काँगेसचे तालुकाध्यक्ष व माजी नगरसेवक सुभाष बाकाळकर, माजी नगरसेवक सुलतान ठाकूर यांनी मुख्याधिकारी भोसले यांची भेट घेतली.

ऐन पावसाळ्यात तीन-तीन दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने शहरवासीयांची मोठी गैरसोय होत असून ऐण सणाच्या दिवशी पाणी पुरवठा न झाल्याने मुस्लिम बांधवांना अडचणीचा सामना करावा लागल्याचे ड .खलिफे यांनी पशासनाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच तत्काळ पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली.

या वेळी मुख्याधिकारी भोसले यांनी कोदवली धरणातील बंद झालेला वॉल सुरू करण्यात आला आहे. मात्र, लाईनमध्ये एअर असल्याने पाणी कमी दाबाने येत असल्याचे सांगितले. तसेच शिळ जॅकवेल येथे जनरेटर मागविण्यात आला असून जनरेटरच्या सहाय्याने पाणी खेचण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आजपासूनच पाणीपुरवठा सुरू होईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, रानतळे परिसराला स्वतंत्र योजना असतानाही पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याच्या येथील ग्रामस्थांच्या तकारी असून एकाच वेळी सर्व लाईन सोडण्यात येत असल्याने रानतळे परिसराला कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तकारी येथील नागरीकांनी मुख्याधिकार्‍यांकडे केल्या.

तसेच नगर परिषदेचे पाणीपुरवठा कामगार नागरीकांशी उद्दाम वर्तन करत असल्याचेही येथील नागरीकांनी सांगितले. या वर रानतळे परिसरातील नागरीकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा व उद्दाम कर्मचार्‍यांना योग्य त्या सूचना देण्याची मागणी अ‍ॅड. खलिफे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here