रायगड/सोलापूर, पुढारी वृत्‍तसेवा : भाजपच्या आणखी एका नेत्यावर महिलेने फसवणुकीचा (Fraud) आरोप केला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत महिला आयोगाकडे देखील दाद मागितली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस, किरीट सोमया यांच्याकडे देखील पिडीतेने न्याय मागितला आहे.

पीडीत महिला ही मूळची सोलापुरातील आहे. २०११ साली या पिडीतेचे लग्न झाले होते. मात्र काही कारणामुळे महिला आणि तिच्या पतीमध्ये वाद सुरु होते. यातून तिने घटस्‍फोट घेतला. याचदरम्‍यान तिचे दक्षिण रायगडचे भाजप जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांच्याशी ओळख झाली.

त्यानंतर महेश माेहिते यांनी मी घटस्फाेट घेतला आहे, असे खोटे सांगत तिच्याशी २०१५ विवाह केला. तशी कागदपत्रे देखील त्यांनी पिडीतेला दाखवली.

महेश मोहिते आणि पिडीत महिलेला एक मुलगी देखील झाली. त्यानंतर मोहिते यांचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट झालाच नसल्याचे पिडीत महिलेला समजले. तसेच पहिल्या पत्नीपासून मोहिते यांना दोन अपत्यं देखील आहेत. आणि आता तिसऱ्या अपत्यामुळे राजकीय करियर संकटात येईल. या भितीने पिडीत महिलेची आणि मुलगीची ओळख लपवून ठेवण्यासाठी सदर महिलेवर दबाव आणण्यास सुरुवात केली. तिला सतत धमक्याही देण्यात असल्याचे आरोप पिडीत महिलेने केले आहेत. (Fraud)

त्या पिडीत महिलेने नवी मुंबई येथील खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र तिची पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने तिने महिला आयोगाकडे देखील तक्रार केली आहे. महेश मोहिते यांचे राजकीय प्रस्थ मोठे असल्याने पोलिसांकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप पिडीतेने केला. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करून योग्य न्याय मिळावा, अशी मागणी पिडीतीने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here