रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : शहरातील परटवणे ते साळवी स्टॉप जाणार्‍या रस्त्यावर गुरुवारी दुपारी डंपरचे एक चाक रस्त्याच्या कडेला गटारात गेल्याने अपघात झाला. अपघातात डंपरमधील दोघे किरकोळ जखमी झालेले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संजय अर्जुन चवताल (38, मूळ रा. आराम, सध्या राहणार उरण मुंबई) आणि मुन्‍ना प्रसाद (28, मूळ रा. बिहार, सध्या रा. उरण मुंबई) अशी जखमींची नावे आहेत. गुरुवारी दुपारी संजय चवताल आपल्या ताब्यातील डंपरमधून मुन्ना प्रसादसह परटवणे ते साळवी स्टॉप रस्त्याने एमआयडीसी येथे जात होता. तो फिनोलेक्स कॉलनी येथे आला असता समोरून येणार्‍या दुचाकी चालकाला वाचवताना त्याने डंपर रस्त्याच्या बाजूला घेतला असता डंपरचे चाक गटारात गेल्याने हा अपघात झाला. अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here