
चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ यांनी भर बाजारपेठेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लावलेल्या बॅनर वरून चांगलाच वाद रंगला आहे. बुधवारी रात्री शिवसैनिकांनी हा बॅनर काढला. त्यामुळे काही काल बाजारपेठेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, सकाळी पुन्हा तोच बॅनर त्याच ठिकाणी झळकला या बॅनरला पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता त्यामुळे आता शिवसेने अंतर्गत चिपळुणातही वाद उफाळण्याचा शक्यता आहे.
गेले महिनाभर शिवसेनेंतर्गत संघर्ष सुरू आहे. शिंदे गट विरुद्ध उद्धव गट यांच्यामध्ये राज्य पातळीवर संघर्ष पेटला आहे. हा वाद टोकाला जात असून शिवसेना नक्की कोणाची इथपर्यंत हा तो गेला आहे. या पार्श्वभूमीवर मात्र अखंड शिवसेनेचा बॅनर चिपळूण झलक झळकल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. लोकांच्या समरभ पसरू नये, म्हणून शिवसैनिकांनी रात्री हा बॅनर काढला या ठिकाणी तत्काळ पोलिस बंदोबस्त दाखल झाला जिल्हा प्रमुखांच्या आदेशानंतर कार्यकर्त्यांनी हा बॅनर काढल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गुरुवारी सकाळी पुन्हा त्याच ठिकाणी बॅनर झळकलेला पाहायला मिळाला. मात्र, या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.