देवगड; पुढारी वृत्तसेवा : देवगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कोट्यवधीचा अपहार करणार्‍या संशयित आरोपींपैकी विष्णू सर्जेराव पाळवदे या एका शिक्षकाला सिंधुदुर्ग आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उस्मानाबाद येथून शुक्रवारी अटक केली. पाळवदे हे सध्या आडसुळवाडी, ता. कळंब, उस्मानाबाद येथे कार्यरत होते. यापूर्वी ते देवगड तालुक्यातील नाडण-वीरवाडी येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत होते.

देवगडचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.या प्रकरणामध्ये पाच आरोपी असून एकमेकांच्या संगनमताने व सहाय्याने 10 एप्रिल 2008 ते 31 मार्च 2016 या कालावधीत देवगड पंचायत समिती शिक्षण विभागात कार्यरत असताना शिक्षण मुलोदय या लेख देयकासंदर्भात स्वतःच्या फायद्यासाठी शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने शासकीय पगाराचे यादीत स्वतःचे नाव नमूद करून, कागदपत्रांचे बनावटीकरण व तसे खोटे दस्तऐवज तयार करून व खोटे हिशोब तयार करून त्याव्दारे अतिप्रदान असलेली रक्कम खात्यावर जमा करून घेवून ती स्वतःच्या फायदयासाठी वापरून 1 एक कोटी 88 लाख 47 हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केलेली असून ही रक्कम व त्यावरील व्याजासह 3,29,78,571 रुपयांचा एकूण अपहार केला, अशी फिर्यादी दाखल केली होती.त्यानुसार संशयितांवर गुन्हा नोंद होता.आर्थिक गुन्हे शाखेच्या महिला पोलिस निरीक्षक श्रीमती आर. जी. नदाफ यांनी अटकेची कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here