ठाणे – कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये गुंगीचे औषध देऊन प्रवाशाला लुटल्याची घटना घडली. चॉकलेटमध्ये गुंगीचे औषध देऊन त्याच्याकडील रोख पाच हजार आणि मोबाईल लांबवण्यात आला. बेशुद्धावस्थेत असल्याने त्याला मंगळवारी सकाळी ठाण्याच्या जिल्हा सिव्हील रुग्णालयात दाखल केले. एकीकडे रेल्वे प्रवासात कोणी खाद्यपदार्थ दिले तर घेऊ नये, असे आवाहन केले जात असताना हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
गुन्हा रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करणार रत्नागिरी

रेल्वेस्थानकादरम्यान तारीक याला चॉकलेट दिल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करून रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती ठाणे आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here