
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : शहरानजिकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील पुलावर रेल्वेची धडक बसून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार (दि. 4 ऑगस्ट) सकाळी 11 वा. सुमारास घडली. सुमित सुनील कांबळे (30,रा.उद्यमनगर, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील सुनील कांबळे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात खबर दिली.
सुमित एमआयडीसी येथील एका साईटवर कामाला होता. गुरुवारी तो घरातून कामावर जाण्यासाठी बाहेर पडला होता. परंतु 11 वा. सुमारास त्याचा मृतदेह कांचन हॉटेल ते वेरोन कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे पुलावर छीन्न-विछीन्न अवस्थेत सापडून आला. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.