सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय मंत्री नारायण राणेंसोबत आपण काम करण्यास तयार, असे वक्‍तव्य आ. दीपक केसरकर यांनी केल्यानंतर त्यांच्यावर जिल्ह्यात टीका झाली. त्यामुळे त्यांनी आज राणें विरोधात केलेले वक्‍तव्य म्हणजे ‘जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती’ असे आहे, अशी टीका सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली.

शिंदे गटाचे मुख्य प्रवक्‍ते आ. केसरकर यांनी आपल्या नातवाबाबतचे वक्‍तव्य माजी महापौर यांनी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपल्याकडे मोठा गौप्यस्फोट असल्याचे सांगून दोन दिवसांत गौप्यस्फोट करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार त्यांनी काल शिवसेना-भाजपा युतीबाबत उद्धव ठाकरे यांच्या मनात राणेंबद्दलची नाराजी असल्याचा गौप्यस्फोट केला. यावर प्रतिक्रिया देताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केसरकर यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, आपली घसरलेली पत भरुन काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे केसरकर आता शिंदे गटाशी किती दिवस प्रामाणिक राहतील यात शंका आहे.

हेही वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here