राजापूर: पुढारी वृत्तसेवा: गेले दोन दिवस राजापूर तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अर्जुनेसह कोदवली नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जवाहर चौकापर्यंत येणारी एसटी वाहतूक सेवादेखील बंद करण्यात आली आहे. शहरातील बंदर धक्का मार्गासह छत्रपती शिवाजी पथ, चिखलगाव, शीळ रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसात तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळा, विद्यालये दुपारी सोडण्यात आली.

ऐन सणासुदीच्या दिवसात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे बाजारपेठेवर परिणाम झाल्याने ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तालुक्याच्या पूर्व परिसरातून वाहणाऱ्या अर्जुना नदीसह कोदवलीकडून आलेल्या नदीला महापूर आला. दोन्ही नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. पूर्व परिसरातील नदीकाठावरील लोकाना सर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचलंत का? 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here