
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील टीआरपी रेल्वे पुलाखाली रेल्वे रुळावर रेल्वेची धडक बसून अज्ञात चाळीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यरात्री 1.30 वा.सुमारास ही घटना उघड झाली.
मृतदेहाचे दोन्ही पाय रेल्वेच्या धडकेत तुटले असून, विवस्त्र अवस्थेत मृतदेह रेल्वे रुळावर आढळला आहे. त्याच्या गळ्यात लाल रंगाचा दोरा आहे. हातात रबरी रिंग आहेत. त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर गस्त घालत असताना रेल्वे कर्मचार्यांना टीआरपी येथील रेल्वे पुलाखाली रेल्वे रुळावर मृतदेह आढळून आला.
त्यांनी याची माहिती आपल्या अधिकार्यांना दिली. रेल्वे अधिकार्यांनी ग्रामीण पोलिसांना माहिती दिल्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. पी. टेमकर यांनी सहकार्यांसह घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या तरुणबाबत बाबत कोणाला माहिती असल्यास ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. पी. टेमकर यांनी केले आहे.