रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : आझादी का अमृत महोत्सवा उपक्रमांतर्गत रत्नागिरी तालुक्यात 56 हजार 317 कुटुंबांना तिरंगा वितरित केला जाणार आहे. आमदार उदय सामंत यांनी यासाठी फंडातून निधी उपलब्ध करून दिला आहे. याबरोबरच विविध शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांना देण्यासाठी खात्यांमार्फत गावस्तरावर यशस्वी पावले उचलली गेली आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी विवेक गुंडे, डी. डी. भोंगले, डॉ. महेश गावडे, अमोल दाभोलकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. शिक्षण विभागामार्फत शाळास्तरावर जनजागृतीसाठी रॅली काढण्यात येत आहेत. महिला बालकल्याण विभागामार्फत कुपोषित बालकांना आहार, मिशन वात्स्यल्य योजनेचा लाभ, महिलांची उपकेंद्रस्तरावर तपासणी, ग्रामसभांमध्ये ध्वजसंहितांची माहिती दिली जात आहे. 9 ऑगस्टपर्यंत या सभा घेण्याचा कलावधी आहे. महाआवास अभियानांतर्गत 15 ऑगस्टपर्यंत 331 पैकी 274 जणांना लाभ दिला आहे. या अंतर्गत चांगले काम करणार्या ग्रामपंचायतींना पुरस्कारही दिला आहे. संमती पत्रका अभावी काही प्रस्ताव मंजूर झालेले नाहीत. त्यांच्या जागी अन्य प्रस्तावांचा विचार केला जाणार आहे. या कालवधीत कर्मचार्‍यांसाठी देशभक्‍तीपर वक्‍तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

तिरंगा वितरणासाठी क्षेत्रीय अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. तालुक्यात 56 हजार 317 कुटूंब असून 52 हजार 174 ध्वजाची मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निधीतून हा खर्च केला जाणार होता. परंतु आमदार उदय सामंत यांनी तो खर्च उचलला आहे. त्यामुळे 23 ग्रामपंचायतींनी दिलेेले धनादेश परत करण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना
सर्वोत्कृष्ट घरकूल म्हणून संदेश गंगाराम भातडे (साठरे), अनिता दिलीप सुर्वे (नेवरे), स्वाती सुर्यकांत गुलापे (चिंद्रवली), सर्वोत्कृष्ट क्लस्टर कोतवडे जिल्हा परिषद गट. रमाई आवास योजनेमध्ये संजना कानाजी कांबळे, संजीवनी संजय जाधव, चंद्रगुप्त राघो जाधव यांचा गौरव केला जाणार आहे. रमाई योजनेत सर्वोत्कृष्ट क्लस्टर वादद जिल्हा परिषद गटाला गौरव मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार कशेळी, गुंबद, ओरी यांना मिळाला आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here