
रायगड; पुढारी वृत्तसेवा : मंगळवार पासून महाबळेश्वर व महाड तालुक्यातील बिरवाडी-रायगड परिसरात कोसळणाऱ्या पावसामुळे महाडमध्ये आज पहाटे पाचच्या सुमारास सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली. सध्या मच्छी मार्केटमध्ये पाणी आले असून ६.७५ एवढी पाणी पातळी आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांना धोक्याचा इशारा देणारे भोंगे वाजवून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.