सिंधुदूर्ग: पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस-पीठढवळ नदी नजीक फॉर्च्युनर गाडी कठड्याला आपटल्याने भीषण अपघात (Accident)  झाला. या अपघातात एक जण ठार, तर सात जण जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील हे सर्वजण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मूळचे राजस्थान येथील हे कुटुंब कुडाळवरून कणकवली तालुक्यातील कासार्ड येथे जात होते. सततच्या पावसामुळे महामार्ग निसरडा झाला होता तसेच ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे पाणी साचले होते. मात्र चालकाला त्याचा अंदाज न आल्याने गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी कठड्याला आपटली. गाडी पलटली असल्याचे महामार्गावरून ये जा करणाऱ्या काही वाहनधारकांच्या लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने प्राथमिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी गोव्यातील बांबुळी येथे हलवण्यात आले. (Accident)

या अपघातात राजू देवी नरपत कुमार माली (वय 30) ही युवती जागीच ठारझाली तर सात जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले जखमी मध्ये असलाराम माली( वय 30), अनिल असलाराम माली( वय 5), स्वरुप नरपत कुमार माली (वय 5), नलित असलाराममाली (वय7), वर्षा नरपत कुमार माली(वय9), भावेश असलाराम माली(वय10), विमला असलाराममाली (वय 25) यांचा समावेश असून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here