सावंतवाडी (पुढारी वृत्तसेवा) : सावंतवाडी -लाडाची बाग येथील घरात रेवती टोपले (40) या महिलेचा मृतदेह सडलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. मृतदेह ताब्यात घेतला. शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वा. पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळी काहीही संशयस्पद नसल्याचे पोलिसांनी सांगितले. लाडाची बाग येथे टोपले यांचे घर आहे. घराचा दरवाजा गेली पंधरा दिवस बंद असल्यामुळे पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी जाऊन दरवाजा उघडला. यावेळी कुजलेल्या अवस्थेत रेवती टोपले यांचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाला पंधरा दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युंची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी सहा पोलिस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांनी भेट दिली.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here