वेंगुर्ले; पुढारी वृत्तसेवा : वेंगुर्ले शहरातील एका सोन्याच्या दुकानातून 3 लाख 88 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी करून फक्त 10 हजार रुपये देऊन फसवणूक करणार्‍या सांगली, ता. जत येथील रणधीर राजेंद्र भोसले (29) याला बेळगाव येथून वेंगुर्ले पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.

3 ऑगस्ट 2022 रोजी वेंगुर्ले कलानगर रामेश्वर कॉम्प्लेक्समधील श्री स्वामी समर्थ ज्वेलर्सचे प्रशांत सदाशिव मालवणकर यांच्या सोन्याच्या दुकानातून संशयित रणधीर राजेंद्र भोसले याने एकूण 3 लाख 88 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी करुन त्या बदल्यात मालवणकर यांना फक्त 10 हजार रुपये व त्यांच्या बँक खात्यावर फक्त 1 रुपया ट्रान्स्फर करून मालवणकर यांची फसवणूक केली. त्यानंतर संशयित फरार होता.याबाबत प्रशांत सदाशिव मालवणकर (54) यांनी वेंगुर्ले पोलिसात फिर्याद दिली होती. संशयित हा हुक्केरी पोलीस ठाणे येथे मिळून आल्याने 12 ऑगस्ट रोजी रात्री बेळगाव येथून वेंगुर्ले पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

त्याच्या ताब्यातून त्याने फसवणूक करुन घेतलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास वेंगुर्ले पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनायक केसरकर करीत आहेत. या तपास पथकात पोलिस नाईक वेंगुर्लेकर, पोलिस नाईक दादा परब, पोलिस नाईक गौरव परब व पोलिस नाईक योगेश राऊळ आदी सहभागी झाले होते.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here