
अलिबाग; जयंत धुळप : आजवर भारतीय स्वातंत्र्य दिनी हिमालयातील उंच शिखरावर भारतीय तिरंगा फडकावून धाडसी ध्वजारोहण करण्यात आले आहे. मात्र यंदाच्या भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनी भारतीय नौदलातील १३ माजी मरीन कमांडोज १३ फूट खोल पाण्यात, पाण्याच्या तळाला अनोखे ध्वजारोहण, संचलन आणि राष्ट्रगीत सादर केले. अशा प्रकारचे पाण्याखालील राष्ट्रीय ध्वजारोहण हे अनोखे ध्वजारोहण ठरले आहे, अशी माहिती या उपक्रमाचे कल्पक नियोजनकर्ते मरीन कमांडो रवींद्र कुलकर्णी यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली आहे.
रविवार १४ ऑगस्ट २०२२ च्या रात्री १०.३० ते १५ ऑगस्ट २०२२ रोजी मध्यरात्री १२.३० या वेळेत १३ फूट खोल पाण्याखाली हा उपक्रम पार पडला. हा अनोखा अंडरवॉटर इंडिपेंडन्स डे सोहळा रायगड जिल्ह्यातील उरण येथील विमला तलावात संपन्न होणार आहे. यामध्ये उपक्रमाचे कल्पक नियोजनकर्ते मरिन कमांडो रवींद्र कुलकर्णी यांच्यासह विनोद कुमार, रामदास काळसे, एन. सी. जे. जीवन, सज्जन सिंग, अनिल घाडगे, भूपेंद्र सिंग, विलास भगत, रामेश्वर यादव, ब्रिजभूषण शर्मा, नंदलाल यादव, रेवण सुंबरे आणि प्रवीण तुळपुळे असे एकूण नौदलाचे 13 माजी मरिन कंमांडोज सहभागी होणार आहेत.
सन २००३ मध्ये जगातील पहिले अंडर वॉटर मॅरेज मरिन सेंटर वाशी येथे आयोजित केले होते. त्यावेळी आपण चंदन व दिप्ती ठाकूर यांचा संपूर्ण विवाह सोहळा पाण्याखाली केला होता. त्यानंतर आपल्या देशाला अनोखी मानवंदना देण्याच्या हेतूने स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या अंडरवॉटर इंडिपेंडन्स डे सोहळ्याचे आयोजन आणखी एक पाऊल पुढे टाकत असल्याचे मरिन कमांडो रवींद्र कुलकर्णी यांनी पुढे सांगितले.
हेही वाचा