
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करताना स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी देशाचे विभाजन झाले. यात लाखो विस्थापित झाले तर लाखो हिंसक कारवयात बळी पडले. त्या सर्वांप्रती फाळणी वेदना स्मृतिदिनातून त्यांच्या वेदनांचे स्मरण रविवारी करण्यात आले. यासाठी एक ऐतिहासिक दस्तावेजांचे प्रदर्शन भरविण्यासोबत दोन मिनिटे मौनातून त्यांच्या वेदनांच्या स्मृती जागविण्यात आल्या. त्याकाळांतील छायाचित्रे व वृत्तपत्रीय बातम्या व दस्तावेज एका प्रदर्शनात मांडले आहे. थिबा पॅलेसमध्ये हे प्रदर्शन आहे. याचा आरंभ श्रद्धांजली अर्पण करून व दोन मिनिटे मौन पाळून करण्यात आला.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जि. प. या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे,उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव, तहसीलदार तेजस्वीनी पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये आदी उपस्थित
होते.
सुरुवातीला उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी या स्मृती दिनाबाबत भूमिका मांडली. त्या काळातील फाळणीच्या वेदना आजच्या व नव्या पिढीला असाव्यात असा उद्देश यामागे आहे. या प्रदर्शनाला सकाळी सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी प्रदर्शन बघण्यासाठी गर्दी केली. त्यात तरुण पिढीची गर्दी अधिक होती.