कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : माशी मारण्याचे औषध प्राशन केल्याने कृतिका निलेश गवाणकर (14 वेताळ बांबर्डे आईनमळावाडी) हिचे कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

या घटनेची फिर्याद चंद्रशेखर अनंत देसाई वरवडे देसाईवाडी यांनी कणकवली पोलीस स्थानकात दिली आहे. रविवार दि. 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी कृतिका हिने माशी मारण्याचे औषध प्राशन केले. यावेळी  त्रास होऊ लागल्याने तिला त्वरित कणकवली येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान 15 ऑगस्ट रोजी उपचार चालू असतानाच पहाटे 3.40 वा. तिचे निधन झाले. कृतीका ही कुडाळ हायस्कूल येथे इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होती. या घटनेचा अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक तेजस्वीनी शिंदे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here