रायगड, पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, हरिहरेश्वर मध्ये आढळून आलेल्या संशयास्पद बोटीची रायगडसह पोलीस महासंचालक, राज्य गुप्तवार्ता विभाग व दहशतवादी विरोधीपथकाने दखल घेतली आहे. कोकणचे पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते घटनास्थळाकडे रवाना झाले असून, रायगड जिल्ह्यासह राज्यात नाकेबंदी करण्यात आली आहे.

हरिहरेश्वर येथे संशयास्पद बोटीत शस्त्रे आढळल्याने जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. येणारी-जाणारी सर्व वाहने तपासणीचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. बोटीमध्ये 3 एके 47 रायफल व जिवंत काडतुसे आढळून आल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.  नेपच्यून मेरीटाईम सिक्युरिटी असे एका बॉक्सवर स्टीकर आढळून आल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here