कणकवली; पुढारी वृत्तसेवा : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असलेले राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे शुक्रवारी दुपारी गोव्याहून रत्नागिरीकडे जाताना काही वेळ कणकवलीत थांबले. त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात समर्थकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. येत्या आठ-दहा दिवसांत आपण पुन्हा सिंधुदुर्गात येणार आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खर्‍या शिवसेनेची ताकद दाखवून दिली जाईल, असे ना. सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी जि.प. माजी सदस्य संजय आग्रे, संदेश पटेल, भूषण परुळेकर, भास्कर राणे, शेखर राणे, सुनील पारकर, बाळू पारकर, संजय पारकर, अतुल दळवी, अनिल मांजरेकर, किसन मांजरेकर, दीपक राऊत, चिन्मय राणे, सुनील हरमलकर, प्रकाश साळवी, पवन भोगले, विठोबा ठाकूर, संदीप खानोलकर, दिलीप गावकर, बाळू टेमकर, दामोदर सावंत, नाना सापळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ना. उदय सामंत म्हणाले, सिंध्ाुदुर्गातील अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहेत. येत्या काही दिवसात आमची ताकद दाखवून दिली जाईल.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here