ठाणे; संतोष बिचकुले : महावितरणचे बिल भरण्याच्या बहाण्याने फोन करून ग्राहकाचे कॉल डायव्हर्ड करून 2 लाख 97 हजार 304 रुपये ऑनलाईन लुटण्यात आले. मात्र माटुंगा पोलिसांच्या सतर्कतेमुळे या रकमेपैकी 2 लाख 65 हजार 590 रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन लुटण्यासाठी भामटे वेगवेगळ्या प्रकारे शक्कल लढवत आहेत. सध्या वीज बिल भरण्याच्या नावाने लुटाण्याचा नवा फंडा हे भामटे वापरत आहेत. अशाच प्रकारे या एका भामट्याने माटुंगा परिसरात राहणार्‍या रमेश शहा (बदलेले नाव) यांच्या मोबाईलवर फोन आला. बेस्ट विद्युत पुरवठा कंपनीचा कर्मचार्‍या असल्याचे सांगून थकीत असलेले बेस्ट कंपनीचे वीज बिल भरा अन्यथा पुरवठा खंडित केला जाईल, असे सांगितले. वीजपुरवठा खंडित होणार असल्याने घाबरलेल्या शहा यांनी त्या कर्मचार्‍याच्या सांगण्यानुसार क्यूक स्पोर्ट नावाचे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊ नलोड केले. तसेच सदर अ‍ॅपचा विशेष कोड त्या कर्मचार्‍याला सांगिला. त्यानंतर कर्मचार्‍याने पाठवलेल्या लिंकवर शहा याने ऑनलाईन बिलाचे पैसे भरले. मात्र बिलाची रक्कम भरल्याचा एसएमएस न आल्याने शहा यांनी त्या नंबरशी पुन्हा संपर्क साधला. शहा हे लुटीच्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच त्या भामट्याने त्यांचे फोनकॉल्स डायव्हर्ड करून क्रेडिट कार्डमधील पैसे ट्रान्सफर करण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे लक्षात शहा यांनी ताबडतोब पोलीस ठाणे गाठले. शहा यांच्या तक्रारीवरून वपोनि दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि संतोष माळही, पोना संतोष पवार, अंमलदार मंगेश जराड यांनी तात्काळ तांत्रिक माहितीच्या आधारे ट्रान्सफर झालेले एकूण रकमेपैकी 2 लाख 65 हजार 590 रुपये पुन्हा क्रेडिट कार्डमध्ये जमा केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here