रत्नागिरी;पुढारी वृत्तसेवा: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मी कडवट शिवसैनिक आहे. मला निष्ठा कोणी शिकवायची आवश्यकता नाही. मी शिंदे गटात जाणार अशी बदनामी मीडियाच्या माध्यमातून कोण करतय! याची माहिती मला मिळाली आहे. ज्याच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. तेच माझी बदनामी करत आहेत. मात्र, यांच्या बदनामीला मी भीक घालत नाही, मी शिंदे गटात जाणार नाही, असे शिवसेना उपनेते, आ. राजन साळवी यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरीतील शिवसेना जिल्हा कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. गुरुवारी रात्रीपासून आ.राजन साळवी शिंदे गटात सहभागी झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. मला खोक्यांची गरज नाही. बाळासाहेबांचे आशीर्वाद हीच माझी शिदोरी आहे. कोकणातील काही आमदार शिवसेनेतून शिंदे गटात गेले. तेव्हा निष्ठावान असलेले आमदार कायम सेनेसोबत राहिले आहेत. आता शिंदे गटात गेलेल्यांना आपल्या पुढील निवडणुकीची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे ते सेनेच्या आमदारांना बदनाम करत आहेत.

हेही वाचा:









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here