
दोडामार्ग; पुढारी वृत्तसेवा : मणेरी येथे समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात उस्मानाबाद-पणजी एसटी बसला अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्यालगच्या झाडाला धडकली. हा अपघात आज (रविवारी) सकाळी ६ च्या सुमारास घडली.
राज्य परिवहन मंडळाची बस उस्मानाबादहून पणजीला जात होती. बस मणेरी येथे आली असता समोरून आलेल्या वाहनाला बाजू देण्यासाठी एसटी चालकाने बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये बस रस्त्यालगतच्या झाडीला जाऊन धडकली. याबाबत माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. एसटीच्या आपत्कालीन दरवाज्यांमधून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
हेही वाचा :