रत्नागिरी : रविवारी सकाळी भाट्ये समुद्रात बुडालेली अल इब्राहिम मच्छीमारी बोट सोमवारी दुपारी भाट्ये किनारी लागली. स्थानिकांनी ती पाण्याबाहेर बाहेर ओढून काढली. या घटनेत बुडून बेपत्ता झालेल्या ओवेस अजूम मखी (21, रा. जयगड, रत्नागिरी)चा याचा मृतदेहही सोमवारी सायंकाळी उशिरा आढळला आहे. राजीवडा येथून अल इब्राहीम ही मच्छीमारी बोट जयगडकडे जाताना बुडाली होती. या दुर्घटनेतून चारजणांना वाचण्यात यश होते. या बोटीतील ओवेस अजूम मखी हा बुडून बेपत्ता झाला होता. समुद्रात काही अंतरावर गेल्यावर बोटीची दोन्ही इंजिने बंद पडल्याने तसेच मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे ती नौका उलटली. दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या अजूम याचा शोध सुरु असतानाचा सोमवारी सायंकाळी उशिराने त्याचा मृतदेह घटनास्थळनजीक आढळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here