रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : मुंबई – गोवा महामार्गावरून गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यांचा प्रवास सुखरुप होण्यासाठी संभाव्य सहा पैकी पाच ‘ब्लॅक स्पॉट’ वरील रस्ता सुरक्षा संदर्भातील त्रुटींची पूर्तता करण्यात आली आहे. चौपदरीकरणाची कामे करणार्‍या ठेकेदारांकडूनच सार्वजनिक बांधकामच्या राष्ट्रीय महामार्ग (दक्षिण विभागाकडून) करून घेण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गावरील सर्वेक्षणातून सहा ब्लॅक स्पॉट आढळून आले. उपप्रादेशिक परिवहन आणि वाहतूक पोलिसांनी हे सर्वेक्षण करून ब्लॅक स्पॉट ची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिली. महामार्गावर सलग 500 मीटरच्या पट्ट्यात जेथे मोठे अपघात होतात, त्याचबरोबर गेल्या तीन वर्षात ज्या ठिकाणी अपघात होऊन 10 पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत अशा अपघातप्रवन क्षेत्रांना ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखले जाते. सहापैकी पाच ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी रस्ता सुरक्षासंदर्भात आवश्यक ती पूर्तता करण्यात आली असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले. एक ब्लॅक स्पॉट कशेडी घाटाच्या बोगद्यातील आहे. हा स्पॉट जुन्या मार्गावर आला असल्याने तेथील सुरक्षा कामाचा आराखडा तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

झेब्रा क्रॉसिंग, मदतीसाठी मनुष्यबळ ठेवणे, रस्ता सुरक्षा संदर्भात सूचना फलक लावणे, वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज यावा यासाठी रंगरंगोटी करणे, दुभाजक, संरक्षक रेलिंग आदी गोष्टींचा समावेश असतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, सर्वे करण्यासाठी आरटीओ यांनी एक समिती गठीत केलेली आहे. या समितीने काही दिवसांपूर्वी सर्व्हे केला असून हा अहवाल राष्ट्रीय महामार्ग कडे सादर केला आहे. जिल्ह्यातील कशेडी घाट, भोस्ते घाट, वेरळ घाट, राजापूर नेरकेवाडी, हातखंबा आणि बावनदी आदी 6 डेंजर स्पॉटचा समावेश आहे. या समितीत महामार्ग पोलीस, वाहतूक पोलीस, जिल्हा पोलीस, आरटीओ आदींचा समितीत समावेश आहे. याचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे सादर करण्यात आला. सुरक्षा संदर्भात 5 स्पॉटच्या ठिकाणची पूर्तता केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here