रत्नागिरी : पीडित अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवून, तिच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करुन तिची बदनामी करणार्‍या आरोपीला विशेष ‘पोक्सो’ न्यायालयाने 10 वर्ष सश्रम कारावास व 5 लाख 35 हजाराचा दंड ठोठावला.

नितीन संजय जाधव (26), रा. काटवली, ता. संगमेश्वर) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना जून 2017 ते 12 डिसेंबर 2017 कालवधीत घडली आहे. आरोपीने पीडित मुलीला फोन करुन, व्हॉटसअप मॅसेज करुन जवळीक साधली व तिच्या अल्पवयाचा फायदा घेऊन बदनाम करण्याची धमकी देऊन तिला काटवली येथे नेऊन जंगलमय भागात तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर वेगवेगळ्या घरात दुचाकीवरुन नेऊन पीडित अल्पवयीन मुलीचे विवस्त्र अवस्थेतील फोटो स्वतःचे मोबाईलद्वारे काढले. त्या नंतर पीडित मुलीच्या नावाचे सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करुन पीडितेचे विवस्त्र अवस्थेतील काढलेले फोटो प्रसिद्ध करुन तिची बदनामी केली.

या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांना देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याबाबतच्या तक्रारीवरुन पोलिसांनी भादवी कलम 376 व लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012, 3, 4, 11, (5) 12 व माहिती तंत्रज्ञान अधिनियम चे कलम 66 (ई) 67 (ए) (बी) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाकडून आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावासासह 5 लाख 35 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीला पाच वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला
आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here