दापोली : पुढारी वृत्तसेवा : दापोली तालुक्यातील मौजे दापोली फाट्याजवळ दि. २५ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दापोली आगारच्या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात १६ प्रवाशांसह एक चालक जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, दापोली आगरातून सुटणारी दापोली मुरादपूर ही गाडी मौजे दापोली फाट्याजवळ आली. बोरिवलीकडून येणारी माटवणमार्गे बोरिवली या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. अपघाताचे स्वरूप भीषण होते. मात्र यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. या बसमध्ये शाळकरी मुलांचा अधिक समावेश होता. सकाळी कामानिमित्त जाणारे प्रवासी अधिक होते. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. चालक आणि वाहकांवर अति कामाचा लोड आणि बेदकरपणे गाडी चालविणे अशी चर्चा यावेळी घटनास्थळी ऐकण्यास मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here