
खेड; पुढारी वृत्तसेवा : हातोडा घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या आज (दि. २७) खेडमध्ये दाखल झाले. दापोलीतील अनिल परब यांच्या भ्रष्टाचाराच्या पैशातून बांधलेले अनधिकृत साई रिसॉर्ट तोडण्यासाठी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवले आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले. खेड येथे आज (शनिवार) दाखल होताच शहरातील तीनबत्ती नाका येथे जाहीर भाषण करताना ते बोलत होते.
यावेळी सोमय्या म्हणाले, महाराष्ट्रात फक्त घोटाळा, भ्रष्टाचार व दादागिरी करणारे सरकार होते. कोव्हिडमध्ये कमाई करायचे काम मंत्री आणि नेते करत होते. त्या पैशातून मंत्री अनिल परब समुद्र किनीरी रिसॉर्ट बांधत होते. त्यांनी या रिसॉर्टच्या रूपाने महाविकास आघाडीच्या घोटाळ्याचे प्रतीक बांधायचे काम केले आहे. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी बेकायदेशीर साई रिसॉर्ट वाचावे यासाठी प्रयत्न केले. मात्र विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने हे भ्रष्टाचाराचे प्रतीक रिसॉर्ट पडायचे आदेश दिले आहेत. त्यांनी व देवेंद्र फडणवीस यांनी मला हे रिसॉर्ट पडायचे काम तुम्ही सुरू करा असे सांगितल्याने, त्यांच्या आदेशाने मी तेथे जात आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा :