सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : कारचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्यावरील दुभाजकाच्या पलीकडे जाऊन पडली. या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात झाराप-पत्रादेवी महामार्गावर नेमळे परिसरात आज (दि. २७) सायंकाळी साडेचारच्या सुमारास झाला. या अपघातामध्ये लोचन पालांडे, संतोष परब यांचा मृत्यू झाला. तर चालक विशाल हाटले हा गंभीर जखमी असून दीपक आचरेकर हा किरकोळ जखमी झाला आहे. हे चौघेजण मालवण तालुक्यातील गोठणे येथील रहिवासी आहेत. दुर्दैवाची घटना म्हणजे जखमीला रूग्णालयात घेऊन जात असणाऱ्या रुग्णवाहिकेने वाटेतच पेट घेतला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कांदा-बटाटा व्यापारी आणि फटाक्यांचे व्यापारी कारने फटाके घेऊन बांदा येथून कणकवलीच्या दिशेने जात होते. यावेळी कारचा टायर फुटल्याने कार दुभाजकाच्या पलीकडे जाऊन पलटी झाली. या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. तर दोन जण जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेले. दरम्यान, काही अंतरावर गेलेल्यावर रुग्णवाहिकेने पेट घेतला. सुदैवाने रुग्ण, चालक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

त्यानंतर दुसरी रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान जळालेल्या रुग्णवाहिकेतील सिलेंडरचा मोठा स्फोट होत असल्याने महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांची भली मोठी रांग लागली होती. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here