रत्नागिरी; भालचंद्र नाचणकर : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी दौर्‍यातील वाय दर्जाच्या सुरक्षेवरून तप्त झालेले वातावरण निवळले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी ना. सामंत यांची भेट घेतली. या भेटीसाठी पोलिस अधीक्षकांना तासभर वाट पहावी लागली. यावरून निर्माण झालेले वातावरण किती गरम होते याचा अंदाज आला. या भेटीत ना. सामंत यांनी उच्च तंत्र आणि त्यांच्या विशिष्ट अशा तर्कशुद्ध शैलीने बाजू मांडल्यानंतर संध्याकाळपासून ना. सामंत यांची वाय श्रेणी सुरक्षेची अंमलबजावणी सुरु झाली.

पुण्यात सामंत यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. उद्योग मंत्री म्हणून शुक्रवारी त्यांचा रत्नागिरी दौरा होता तेव्हा त्यांना वाय श्रेणीनुसार आवश्यक असणारी सुरक्षा दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी पूर्वीप्रमाणेच त्यांच्या ताफ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या चार ते पाच पोलिसांची सुरक्षा परत पाठवली. यानंतर ना. सामंत यांनी रत्नागिरीत मोठ्या गर्दीतील अनेक कार्यक्रम केले.

वाय सुरक्षेसंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत पोलिस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांना सर्कीट हाऊस येथे यावे लागले. येथील सभागृहामध्ये बच्चे कंपनीच्या जलतरण स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी ना. सामंत निघून गेले. हा कार्यक्रम संपेपर्यंत पोलिस अधिक्षकांना ना. उदय सामंतांच्या भेटीसाठी तासभर वाट पहावी लागली. त्यामुळे वातावरण किती तप्त आहे, याचा अंदाज येत होता. तासाभरानंतर पोलिस अधिक्षक आणि उद्योगमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत ना. सामंत यांनी उच्चतंत्र आणि आपल्या विशिष्ट अशा तर्कशुद्ध शैलीने बाजू मांडली. यानंतर वाय श्रेणीनुसार त्यांना सुरक्षा मिळाली. ही बैठक झाल्यानंतर उद्योगमंत्री सामंत चांदसूर्या येथे एका कार्यक्रमासाठी गेेले होते. त्यानंतर ते रात्री 10.50 च्या कोकणकन्या एक्स्प्रेसने मुंबई जाण्यासाठी रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर आले. या सर्व दौर्‍यात वाय श्रेणीनुसार आवश्यक असणार्‍या सुरक्षेची अंमलबजावणी झाली होती.

प्रोटोकॉल न पाळल्याने सुरक्षा पाठवली होती परत

शुक्रवारी सकाळपासून सुरु झालेल्या रत्नागिरी दौर्‍यात वाय श्रेणी सुरक्षेचा प्रोटोकॉल पाळला गेला नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे असलेली पोलिस सुरक्षा ना. उदय सामंत यांनी परत पाठवली. पोलिस सुरक्षा नसल्याचे कळल्यानंतर त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी ताफ्यात आणि कार्यक्रमस्थळी उपस्थित लावली. संध्याकाळी मात्र वाय सुरक्षा मिळाल्यानंतर सर्वांनीच निःश्‍वास सोडला.









1 COMMENT

  1. Hey would you mind letting me know which webhost you’re working with?
    I’ve loaded your blog in 3 different internet browsers and I must
    say this blog loads a lot quicker then most. Can you recommend a good hosting provider at a honest price?
    Thank you, I appreciate it!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here