रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव काळात कोकणात येणार्‍या चाकरमान्यांची प्रवास तिकिटात कोणतीही लूट हो ऊ नये, यासाठी आता आरटीओ कार्यालयाने खासगी प्रवासी वाहतूकीचे भाडेदर निश्चित केले आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमानी लाखोंच्या संख्येने जिल्ह्यात दाखल होणार असल्याने खासगी बस वाहनांनाही तितकीच मागणी या कालावधीत असते. त्यामुळे खासगी वाहतूक दारांनी एसटी बसेसच्या 50 टक्के अधिक भाडेदर देता घेणार असून दीड पट घेतल्यास प्रवाशांनी रत्नागिरी आरटीओ कार्यालयाकडे तक्रार करावी, असे आवाहन सहायक आरटीओ अजित ताम्हणकर यांनी केले आहे.

गणेशोत्सव काळात खासगी बस वाहतूक तिकिट भाडे दर मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, तक्रार करायला समोर कोणी येत नाही. त्यामुळे प्रवाशांनी किमान आरटीओ कार्यालयांशी फोनवरून तक्रार दिल्यास संबंधित वाहनांवर कारवाई केली जाईल. गावी गणेशोत्सवाला येण्यासाठी प्रत्येकजण गडबडीत असतो यावेळी तो जादा तिकिटाचे पैसे मोजून मोकळा होतो. यामुळे प्रवाशांची लुट होते, याला आळा घालण्यासाठी नागरिकांनी जागरुक राहणे आवश्यक आहे. एसटी बसेच्या तिकिटपेक्षा कोणी दीड पट तिकिट दर आकारल्यास 02352225444 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन आरटीओ कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

रत्नागिरी महामहामार्गावर गणेशोत्सवासाठी दाखल होणार्‍या प्रवाशांचे आरटीओ कार्यालयाकडून स्वागत करुन त्यांच्या वाहनांच्या मागे जनजागृती स्टीकर लावण्यात येत आहे. तसेच अपघात होवू नये, नियमांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी योग्य सूचनाही प्रत्येक वाहनधारकांशी बोलुन केले जाते. रविवारपासून जिल्ह्यात चाकरमानी दाखल होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. सर्वाधिक प्रवाशी 29 आणि 30 ऑगस्ट रोजी दाखल होणार असल्याने आरटीओ कार्यालयाने आपली टीम सज्ज ठेवली आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here