
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : मराठमोळ्या संस्कृतीमध्ये गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे विघ्नहर्त्या गणरायाच्या उत्सवाची प्रतीक्षा आबालवृद्धांना वर्षभर लागलेली असते. यंदाच्या गणेशोत्सवाची प्रतीक्षा संपली असून चैतन्यदायी सोहळ्यास बुधवारपासून प्रारंभ होत आहे. सर्वांच्या लाडक्या गणरायांचे आगमन गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर होत आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याने या मंगलमय सोहळ्याच्या स्वागतासाठी अवघा रत्नागिरी जिल्हा सज्ज झाला आहे.
यंदा जिल्ह्यात 114 सार्वजनिक तर 1 लाख 66 हजार 140 घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. गणरायाच्या आगमनाची तयारी सार्वजनिक मंडळांसह घरोघरीही झाली असून बुधवारी लाडका गणराय विराजमान होणार आहे. जिल्ह्यातील पोलिस ठाणेनिहाय आकडेवारीनुसार, गुहागर : 2 सार्वजनिक तर 14 हजार 460 खासगी, दाभोळ : 1 सार्वजनिक तर 1 हजार 493 खासगी, रत्नागिरी ग्रामीण : 1 सार्वजनिक, 9 हजार 447 खासगी. जयगड : 7 सार्वजनिक, 2 हजार 810 खासगी; देवरुख : 7 सार्वजनिक, 12 हजार 493 खासगी; अलोरे : 3 सार्वजनिक, 5 हजार 650 खासगी; रत्नागिरी शहर : 26 सार्वजनिक, 7 हजार 911 खासगी; राजापूर : 7 सार्वजनिक तर 19 हजार 900 खासगी; चिपळूण 15 सार्वजनिक तर 16 हजार 464 खासगी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. खेडमध्ये 17 सार्वजनिक तर 13 हजार 736 खासगी, मंडणगड 7 सार्वजनिक तर 4 हजार 395 खासगी, बाणकोट 2 सार्वजनिक तर 767 खासगी, सावर्डे 1 सार्वजनिक तर दहा हजार 240 खासगी, पूर्णगड सार्वजनिक गणपती नाही तर 5 हजार 679 खासगी, दापोली 9 सार्वजनिक तर सहा हजार 332, नाटे 2 सार्वजनिक तर 7 हजार 279 खासगी, लांजा 6 सार्वजनिक तर 13 हजार 540 आणि संगमेश्वर 1 तर सार्वजनिक तर 13 हजार 544 खासगी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. कोरोना काळात गणेशमूर्तींच्या उंचीवर शासनाने काही निर्बंध लावले होते. ते यंदा हटविले आहेत. यंदा ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 6 सार्वजनिक तर 13 हजार 540 आणि संगमेश्वर 1 तर सार्वजनिक तर 13 हजार 544 खासगी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.
कोरोना काळात गणेशमूर्तींच्या उंचीवर शासनाने काही निर्बंध लावले होते. ते यंदा हटविले आहेत. यंदा ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.