रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : गणपतीपुळे येथे समुद्रात बुडणाऱ्या नांदेड येथील पर्यटकाला सागर रक्षकाने सुरक्षित बाहेर काढले. ही घटना बुधवारी (दि.31) दुपारी घडली. याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, गुलशन सुधाकर राठोड (वय 28), रा.माहूर, नांदेड असे वाचवण्यात आलेल्या पर्यटकाचे नाव आहे. बुधवारी गुलशन राठोड आपल्या 20 मित्र-मैत्रिणीसह ट्रॅव्हलर गाडी (एमएच-14-एनजी-9904) मधून गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते.

देव दर्शन झाल्यानंतर ते सर्वजण समुद्रात पोहण्यासाठी गेले. त्यातील गुलशन राठोड यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात लाटांसोबत खोल समुद्रात वाहून जाऊ लागला. ताे बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या सहकाऱ्यांनी आरडा-ओरडा करण्यास सुरुवात केली.

ही बाब सागर रक्षक शरद मयेकर (41, रा. मालगुंड, रत्नागिरी ) यांच्या लक्षात येताच त्यांनी बाेटीने जावून पाण्यात उडी मारली. त्यांनी गुलशन राठोडला पकडले परंतु लाटांचा वेग जास्त असल्याने त्यांना समुदकिनारी येता येत नव्हते. अखेर 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर शरद मयेकर यांनी बुडणाऱ्या गुलशनला समुदकिनारी आणले.

हेही वाचा 

भंडारा : ‘लाचलुचपत’च्या चौकशीच्या भीतीने वन कर्मचा-याची आत्महत्या

कराड : पुणे-बंगळूर महामार्गावर कार पलटी, चारजण जखमी

काष्टी: महाराष्ट्र एक्सप्रेस लुटण्याचा प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here