खेड (रत्नागिरी), पुढारी वृत्तसेवा : न्यायालयाच्या आवारामध्ये एका महिलेने गुरुवारी (दि. १) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बेशुद्ध अवस्थेतेतील महिलेला कोर्टातील कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली आहे. महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती.

दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचे नावही अद्याप समजू शकलेले नाही.  खेड न्यायालयाच्या आवारात असलेल्या मंदिराशेजारी या महिलेने अनेक गोळ्या खाल्ल्या. गोळ्या खाल्ल्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडली आणि ती बेशुद्ध पडली. मात्र, तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा होत आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. न्यायालयातील कर्मचारी आणि न्यायालयीन कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलून त्या महिलेला कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात तिच्यावरती तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here