सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : जगातील सर्वात उंचीवरच्या खारदुंगला (लडाख) येथे ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मॅरथॉनसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन सुपुत्रांची निवड झाली आहे. सावंतवाडीचे ओंकार पराडकर आणि कुडाळ केरवडे येथील प्रसाद कोरगावकर यांची निवड जिल्ह्यासह राज्याला भूषणावह व अभिमानाची बाब आहे.

समुद्र सपाटीपासून 18,000 फूट ( 6500 मीटर) उंचीवर असणाऱ्या खारदुंगला मॅरथॉनमध्ये जगभरातून दरवर्षी १५० धावक निवडले जातात. यामध्ये ओंकार पराडकर व प्रसाद कोरगावकर यांची निवड झाली असून हे दोघेही सिंधु रनर्स टीमचे सदस्य आहेत. अतिशय खडतर अशा लडाख मध्ये ही मॅरेथॉन ९ सप्टेंबर रोजी पहाटे 3:30 वाजता सुरू होईल. खारदुंगला विलेज ते लेह मार्केट असा 72 किलोमीटरचा हा प्रवास तब्बल 14 तासात पार करायचा आहे.

रक्त गोठवणारे पहाटेचे 4 अंश तापमान, तर अंगाची लाही लाही करणारे दुपारचे 38 ते 45 अंश तापमान आणि 4० टक्के ऑक्सिजन लेव्हल या सर्व संकटांवर मात करून ही रेस पूर्ण करायची आहे. प्रसाद व ओंकार हे दोघेही निधारीत वेळेत ही रेस पूर्ण करून आपल्या जिल्हयाचे नाव नक्कीच उंचावतील, यात शंका नाही.

या दोघांनाही सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे व युवराज्ञी श्रद्धा राजे भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा मेडीकल असोसिएशन, सिंधुरनर्स टीमचे सर्व सदस्य व रनर्स समरन पराडकर, कोरगांवकर कुटुंबीय, मित्रमंडळी, सागर चव्हाण, रुपेश पाटील, बोरदेकर कला मंच केरवडे, केरवडे ग्रामस्थ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचलंत का ? 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here