पोलादपूर (रायगड), पुढारी वृत्‍तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात एसटी बस व इनोव्हा कार यांच्या समोरासमोर धडक  झाली. या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि.३) दुपारी घडली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, एसटी चालक नागेश बबनराव गुरव रा. गोरेगाव हे एसटी बस क्रमांक एम एच १४ बी टी २४९९ विठ्ठलवाडी कल्याण ते चिपळूण घेऊन कशेडी घाट चढत असताना इनोव्हा कार ही संगमेश्वर ते मुंबई दिशेने जात असताना एसटी बस व इनोव्हा कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. सुजित शशिकांत घाग (वय ४७), निशा शशिकांत घाग, सर्वेश सुजित घाग (वय १२), समृद्धी सुजित घाग (वय ३६) रा.नायशी संगमेश्वर, सुरज विलास जंगम (वय २३ रा. काटवली महाबळेश्वर) हे अपघातात जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच नरवीर रेस्क्यू टीमने धाव घेत मदत कार्य केले. जखमींना तात्‍काळ पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी एकाच्या डोक्याला गंभीर मार लागल्‍याने पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here