मुंबई; पुढारी वृत्तसेवा : प्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत यांच्या म सांग ना.. म या आगळ्यावेगळ्या ऑडिओ – व्हिडिओला मोठी पसंती मिळत आहे. यू-ट्युबवर प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्याने दहा तासांमध्ये लाखाहून अधिक व्ह्यूज मिळालेत.

प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे वैशाली सामंत यांची प्रॉडक्शन हाउसमध्येही दमदार एन्ट्री झाली आहे. मी अनेक हिट गाणी दिली आहेत. तरीही चाहत्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे रसिकांना आणखी काय चांगले आणि नवे देउ शकते, याचा मी सतत विचार करते. म सांग ना.. म गाणे त्या विचारांसाठी पूरक आहे, असे मला वाटते. भावनेची (इमोशन्स) एक भाषा असते. हे गाणे त्या इमोशन्सचे आहे. गाण्याला काय दिशा मिळेल, हे ठाउक नव्हते. मात्र, गाणे तयार करायचेच, हे मी नक्की केले होते. सुदैवाने टी-सीरिज मराठी कंपनीने मला या गाण्याच्या अल्बमसाठी विचारणा केली. त्यांनाही रोमँटिक गाणे हवे होते. आपको गाना अच्छा लगा, तो अच्छाही होगा, अशी कॉम्प्लीमेंट मला मिळाली. अभिजीत आणि सुखदा या खांडकेकर दाम्पत्यासोबत काम करण्याची इच्छा होती. या जोडीला ऑनस्क्रिन आणण्याची छान संधी आहे. त्यांनी माझ्या कल्पनेतील जोडी प्रत्यक्षात साकारली, असे वैशाली सामंत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

टी- सिरीज मराठी, ऐका प्रोडक्शन आणि वैशाली सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या म सांग ना.. म गाण्याचे गीतकार-संगीतकार आश्विन भंडारे आहेत. तसेच हे गाणे राहुल खंदारे यांनी दिग्दर्शित केले आहे. आपल्या अपेक्षेप्रमाणे अल्बम साकारला गेल्याने वैशाली यांनी दिग्दर्शक राहुल खंदारे, गीतकार-संगीतकार आश्विन भंडारे तसेच मेकिंगमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाचे आभार मानले. राहुल यांच्यामुळे माझ्या मनातील प्रवास मला जशाच्या तसा पडद्यावर साकारण्यात यश आले, असे त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here