
रत्नागिरी : पुढारी ऑनलाईन; आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते रत्नागिरी येथे जाताना त्यांच्याकडील शासकीय वाहन आणि सुरक्षा काढून घेण्यात आली. त्यांना खासगी गाड्या देण्यात आल्या. सरकारच्या या कृतीवर माझ्या सुरक्षेपेक्षा फॉक्सकॉन प्रकल्प महत्त्वाचा आहे. माझ्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्यास यासाठी शिवसैनिक पुरेसे असल्याचे मत शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी मांडले आहे.
शिवसंवाद यात्रा । आपला भगवा, आपली शिवसेना । रत्नागिरी संवाद – LIVE#ShivSena #AadityaThackeray https://t.co/WUqmMwXx98
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) September 16, 2022
यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, माझ्यासाठी तरूणांच्या रोजगारांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. रिफायनरी प्रकल्प हा महत्वाचा प्रकल्प असला तरी, येथील लोकभावना म्हत्वाची आहे. रिफायनरीबाबत दोन्ही बाजू आम्ही समजून घेऊ, तसेच कोणत्याही परिस्थितीत आम्ही स्थिनिकांसोबत असल्याचेही ते म्हणाले.
आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा हा रत्नागिरीत सुरू झाला आहे. त्यामुळे ते रत्नागिरीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी येथील रिफायनरीसंबंधात येथील स्थानिकांशी संवाद साधत, त्यांची बाजू समजून घेतली. यानंतर ते चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार असल्याचेही समजत आहे.