
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : दुचाकीवरून जात असणाऱ्या महिलेचा रस्त्यावर मांजर आडवी आल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. खेडशी येथील आकाशवाणी केंद्राजवळ गुरुवारी दुपारी हा अपघात झाला. अनामिका पवार (वय 37, रा. रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
राजेश पवार व अनामिका पवार हे दोघे पती-पत्नी आपल्या मुलाच्या शाळेतील मिटींग आटपून घरी परतत होते. यावेळी अचानक दुचाकीच्या आडवे मांजर आल्याने गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मागे बसलेल्या पत्नी अनामिका यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या. या अपघातात अनामिका यांच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या कानातून रक्त येऊ लागले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा