रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कुवारबाव जवळील रेल्वे रुळावर शुक्रवारी (दि.२३) सायंकाळी छीन्न-विछीन्न अवस्थेत तरुणाचा मृतदेह सापडून आला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रणव कृष्णा सनगरे (२४ ,मूळ रा.टिके भातडेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत प्रणवचे मेहुणे प्रतीक चंद्रकांत पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. प्रणव सनगरेला कोच्चीवली भावनगर एक्सप्रेसची धडक बसल्याने त्याच्या मानेपासून डोक्याचा भाग शरीरापासून वेगळा होऊन मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष गायकवाड करत आहेत.

हेही वाचलंत का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here