बांदा; पुढारी वृत्तसेवा : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर तोर्से (पेडणे-गोवा) येथे मालवाहू कंटेनर आणि चारचाकीची धडक होऊन भीषण अपघात झाला. दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत पुणे येथील गुंडेशा कुटुंबातील महिला व तिच्या एक वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. चारचाकीतील अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खराब रस्त्याच्या दुरावस्थेमुळेच आज अपघात होऊन माय लेकरांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

पुणे येथील पियुष गुंडेशा हे पत्नी अपूर्वा (वय ३२), दीड वर्षाचा मुलगा, सात वर्षांची मुलगी व घरकाम करणाऱ्या महिलेसह गोवा येथे पर्यटनासाठी जात होते. एमएच १२ टीएस ८७८० या क्रमांकाच्या चारचाकीने ते जात होते. दरम्यान मुंबईच्या दिशेने मासळी वाहतूक करणाऱ्या कंटेनरने (केएल १० – एझेड ८०९६) चारचाकीला समोरासमोर जोरदार टक्कर दिली. या अपघातात चारचाकीचा चेंदामेंदा झाला. यामध्ये आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here